खऱ्या अर्थाने उदारमतवादी, लोकशाहीवादी असलेल्या समाजात असहमती व्यक्त करणारे प्रश्न उपस्थित केले गेले, तर भुवया उंचावल्या जात नाहीत
प्रत्येकाला समान दर्जा असल्याने लोकशाही ही धर्मनिरपेक्षच असू शकते. लोकशाही देशांतील संस्थांमध्ये समाजातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व असतं आणि प्रत्येक घटकाला समान दर्जा प्राप्त असतो. ही गोष्ट धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी आणि राष्ट्रवादी अशा सर्वांचं एकात्मीकरण करण्यास साहाय्यभूत ठरते. असहमतीचा अधिकार आणि सामाजिक न्यायाची मागणी या खऱ्या लोकशाहीच्या संकल्पनेच्या गाभ्याशी असलेल्या गोष्टी आहेत.......